
पुण्यात दौंडमध्ये अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडलीय. प्रविण दत्तात्रय पवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. प्रविणचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब महिलेच्या मुलाला खटकत होती. यावरून प्रविण आणि अल्पवयीन मुलामध्ये अनेकदा वादही झाला होता. वारंवार सांगितल्यानंतरही प्रविण ऐकत नसल्यानं महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या मनात राग होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.