'पाकिस्तान जिंदाबाद'च्या नाऱ्यावर 'हर हर महादेव'ने उत्तर; पुण्यात मनसेचा एल्गार

MNS Protest
MNS ProtestSakal

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचा 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेनंतर मनसेने पुण्यात एल्गार पुकारला आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेला आता मनसेकडून 'हर हर महादेव' अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन चालू आहे.

(MNS Protest Against PFI Worker)

'दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे' या घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात येत असून पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला आहे. यावेळी अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावचं वातावरण निर्माण न होण्यासाठी पोलिसांकडून दखल घेतली जात आहे.

MNS Protest
Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

दरम्यान, गुरूवारी राष्ट्रीय तपास संस्थेने PFIच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकून १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओही व्हायरल झाला आहे पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

तर PFI च्या अटक केलेल्या आरोपींकडून अनेक मोठमोठे खुलासे होऊ लागले आहेत. PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं ATSच्या तपासातून समोर आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com