...स्कॅन नव्हे हा तर MRI स्कॅम; शिवसेना आमदार मनिषा कायंदे

काल नवनीत राणा यांचे MRI करतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
Manisha Kayande
Manisha KayandeSakal

मुंबई : काल नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असतानाचे फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेने लीलावती रुग्णालयाला धारेवर धरले आहे. शिवसेनेच्या मुंबईतील महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लीलावती रुग्णालायाविरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Manisha Kayande
लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार

लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल झाल्यावर शिवसनेच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला फटकारलं होतं. परवानगी नसताना शूटिंग कशी करु शकता असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर आमदार मनिषा कायंदे म्हणाल्या की, हा MRI स्कॅन नाही तर स्कॅम आहे. जर परवानगी नसताना तुम्ही शुटींग करत असाल तर बाकीच्या रुग्णांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

MRI रूममध्ये अनेक नियम असतात मग हे सगळं संगनमताने झालं की जबरदस्ती केलं गेलं याची चौकशी व्हायला पाहिजे. याप्रकरणी सगळे सीसीटीव्ही फुटेज घेऊन तपासणी केली गेली पाहिजे. यासाठी आम्ही गृहमंत्र्यांना भेटणार असून चॅरिटी कमिशनकडे देखील तक्रार करणार आहोत असं त्या म्हणाल्या.

Manisha Kayande
मुंबईत योगी सरकारचं कार्यालय; राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद?

दरम्यान संजय राऊत यांचेदेखील रुग्णालयातील फोटो होते असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, त्यांचे फोटो हे डायग्नोस्टीक सेंटर मधले होते. पण MRI करताना शूटींगसाठी लीलावती रुग्णालयाने परवानगी दिलीच कशी? कोणाला हाताशी धरून हे सगळं केलं का? रुग्णालयात C ग्रेड सिनेमाचं शूटिंग होत होत का? असे सवाल करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राणा दाम्पत्यावर तुरूंगात असताना आत्याचार झाल्याप्रकरणी ते देशाच्या गृहमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यावर कायंदे म्हणाल्या की, राणा दाम्पत्यांना जिथे जायचं तिथे जाऊ द्या, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन तक्रार केली तर तो आमचा विषय नाही. असं त्या म्हणाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com