सिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची तोडफोड केली.

पुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची तोडफोड केली.

गुरुवारी दुपारी मनसेचे काही कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी सिंचन भवनाच्या प्रवेशद्वारावर आले. त्यांनी सिंचन भवनात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची तोडफोड केली. या घटनेनंतर सिंचन भागातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे. खडकवासला प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे दोन विद्युत पंप बंद केल्यामुळे काही संघटनेच्या कार्यकर्त्याकडून हा प्रकार घडला असावा, असे शेलार यांनी सांगितले.

Web Title: Pune: MNS workers have cracked the pipeline in the irrigation house