Pune Rain News: पुण्यात मुसळधार पाऊस! टेम्पोवर कोसळले वडाचे झाड; वाहतूक ठप्प

Pune Rain News: तर शुक्रवारी संततधार पावसामुळे सदाशिव पेठेतील उमाई अभ्यासिका जवळ असलेले अती प्राचीन वडाचे झाड कमकुवत झाल्यामुळे टेम्पोवर कोसळले.
Pune Rain News
Pune Rain Newsesakal

करिश्मा निकम

पुणे : आज पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी एक वडाचे झाड टेम्पोवर कोसळून दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसून टेम्पोचे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील सदाशिव पेठेत घडली आहे. या घटनेनंतर काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती.

अधिक माहितीनुसार, मागच्या तीन ते चार दिवसांपासून पुणे आणि परिसरामध्ये पावसाने जोर धरला आहे. तर शुक्रवारी संततधार पावसामुळे सदाशिव पेठेतील उमाई अभ्यासिका जवळ असलेले अती प्राचीन वडाचे झाड कमकुवत झाल्यामुळे टेम्पोवर कोसळले.

झाडाखाली कुणीच नसल्यामुळे सुदैवाने या दुर्घनेत कुणालाच जखम झाली नाही. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे. रस्त्याने जात असलेल्या एक दुचाकीस्वार या घटनेतून वाचल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Rain News
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत बनावट ओळखपत्रांचा सुळसुळाट

दुचाकी पुढे गेल्यानंतर क्षणात हे झाड कोसळल्याने दुचाकीस्वार बचावला आहे. तर पावसाने कालपासून जोर धरल्याने कमकुवत झालेल्या मुळांनी माती सोडली आणि टेम्पोवरती कोसळले असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाड रस्त्यावरून हलवण्याचे काम सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com