पुणे : 3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोके

खडकवासला परिसरातील 24 वर्षे वयाचे तुषार दिघे, कृष्णा मरगळे यांची कामगिरी
3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोके
3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोकेsakal

खडकवासला : ते दोघे झोपाळ्यावर रात्रीचे काही तास बसून होते. वारा वाहत होता. थंडी वाजल्याने ते झोपाळ्यावरून खाली उतरले. तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे. होय नवलच आहे. तो झोका बांधला होता, मुळशी तालुक्यातील तैल आणि बैल या दोन वेगवेगळ्या सुळक्यावर… त्या झोक्याची समुद्र सपाटी पासून उंची होती, तीन हजार तीनशे फूट तर डोंगरावरील जमिनीपासून १७० ते १८० फूट उंची होती. तर झोक्याच्या दोन्ही बाजू 90 ते 100 फूटावर बांधल्या होत्या. आहे की नाही मग नवल… !

झोपाळा किंवा झोका शब्द जरी उचारला तरी झोपळ्यावर बसून मन हवेत झोके घेत असते. पण हा झोका मात्र आयुष्यभर आठवणीत राहणार हे झोके खडकवासला परिसरातील 24 वर्ष वयाचे तुषार दिघे, कृष्णा मरगळे यांनी घेतले. सिंहगड पायथ्याशी असलेल्या एस. एल. अडव्हेंचर्स यांच्यावतीने याचे आयोजन केले होते.

3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोके
वालचंदनगर : छत्रपतीच्या कामगारांची दिवाळी गोड

दोन सुळक्याना झोपळे बांधण्याची कल्पना भारती हॉस्पिटलमधील डॉ.शिरीष कुलकर्णी यांच्या मनात होती. ती लहू उघडे व मानसिंग चव्हाण यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचे नियोजन केले. एस. एल. अडव्हेंचर्सच्या १५- १६ जणांच्या टीमने क्लीफ कॅम्पिंग यशस्वी पूर्ण केली.

झोपाळ्यावर बसलेला तुषार दिघे हा खेड शिवापूर येथील तर कृष्णा मरगळे हा खानापूर येथील आहे. रात्रभर या झोक्यावर राहायचे होते. पण वारा वाहत होता. थंडी जास्त असल्याने ते खाली उतरले सकाळी पुन्हा झोक्यावर पोचले. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागला. ही मोहिम करताना गिर्यारोहणातील सुरक्षेची सर्व काळजी घेतली होती. मुळशीतील राजेश जानकार, इंदापूरचे योगेश करे, अकोले संगमनेरचे अमित वैद्य, योगेश काळे, पुण्यातील सुरज भगत, पिंपरी चिंचवडचे स्नेहल घेरडे, मुंबईचे मनोज वांगड खानापूरचे, मंगेश सांबरे हे टीम मध्ये होते.

3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोके
इंदापूर : पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत १२३ विषयांना मंजुरी

खूप जबरदस्त अनुभव होता. आनंद तर होताच, पण मनात थोडी धाकधूक होती. हे एकाच वेळी अनुभवास मिळाले. आत्मविश्वास असल्याने हे शक्य झाले. भविष्यात अजून खूप काही नवीन करता येईल आणि शिकता येईल. असा अनुभव आला. असे तुषार दिघे व कृष्णा मरगळे यांनी सांगितले.

सह्याद्रीतील नैसर्गिकरित्या असणाऱ्या डोंगरदऱ्या कपारी, सुळके यातून गिर्यारोहण करणे हा वेगळा अनुभव आहे. त्यातून काही गोष्टी आम्ही हटके करीत असतो. त्यात यश येण्यासाठी परिपूर्ण नियोजन, जास्तीची सुरक्षितता, दर्जेदार उपकरणे व तांत्रिक सहाय्य हे अत्यंत गरजेचे आहे.

-लहू उघडे, गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com