Pune : मुजोर मेस्को सुरक्षारक्षक; हतबल बाजार समिती प्रशासन

अडत्यांसह विविध घटकांना करावा लागतोय दादागिरीचा सामना
Pune
Pune Sakal

पुणे : मार्केट यार्डात सुरक्षेसाठी नेमलेले मेस्कोचे (महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादीत) सुरक्षारक्षकच दादागिरी करत असल्याने अडत्यांसह विविध बाजार घटक हैराण झाले आहेत. मेस्कोची सुरक्षा "नको रे बाबा' अशी भूमिका बाजार घटकांकडून घेण्यात येत आहे. तसेच बाजार समितीने सूचना करूनही यात कोणतही फरक पडलेला नाही. त्यामुळे मुजोर मेस्को सुरक्षारक्षक आणि हतबल बाजार समिती प्रशासन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर सातत्याने चोऱ्या होत आहेत. त्याला चाप बसण्यासाठी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मेस्कोचे सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, चोऱ्या होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तसेच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांची नाराजी आहे.

बाजारात दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गर्दी कमी असते. यावेळी चोरट्यांकडून टार्गेट करण्यात येते. त्यावेळी सुरक्षारक्षकांची गस्त वाढवावी, बाजार आवारात सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात यावी, अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत. तर ग्राहकांशी वाद घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.

मेस्कोची सुरक्षा व्यवस्था निष्क्रिय असून फक्त प्रवेशद्वारावर उभे राहण्याचे आमचे काम आहे. बाजार आवारामध्ये गस्त घालणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे आवारात गस्तच नसल्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्याला जबाबदार कोण ?- करण जाधव, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन.विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका, अशा सुचना त्यांच्या वरिष्ठांना केल्या आहेत. तसेच बाजार आवारातील काही घटकांकडून दादागिरीची भाषा केली जाते. नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे मेस्को आणि त्यांच्यात वाद घडत असतील.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

बरे वाईट होईल, ते बाजार समितीचेचआम्ही कुणाला भीत नाही. जे काही बरे-वाईट होईल, ते बाजार समितीचे होईल. आम्हाला काय फरक पडणार नाही. थोडीच आमची कायमची नोकरी आहे, अशी भाषा मेस्कोच्या सुरक्षारक्षकांकडून वापरण्यात येत आहे. रविवारी हे दिसून आले. बाजार समिती याला कशा प्रकारे आळा घालणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com