Pune : नदीकाठ सुधार योजनेत काढण्यात येणाऱ्या झाडांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची झाडे

अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांची माहित; नदी सुधार प्रकल्पात येणारी सुमारे सहा ते सात हजार झाडे महापालिकेकडून तोडली जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे.
Mula-Mutha River
Mula-Mutha Riversakal

पुणे - मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नदी सुधार योजनेत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येणार असल्याच्या चर्चेत कुठलेही तथ्थ नाही. तर संबंधित ठिकाणी सुबाभूळ, कुबाभळ हि सर्व झुडुप प्रकारातील झाडे आहेत.

त्यांची अनियंत्रित वाढ होते. संबंधित ठिकाणी जेथे झाडे काढायची आहे, तेथीलच सुबाभूळ, कुबाभुळ या स्वरुपाची झाडे काढण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिकेच्या प्रकल्प विभागाने एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे.

नदी सुधार प्रकल्पात येणारी सुमारे सहा ते सात हजार झाडे महापालिकेकडून तोडली जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या प्रकाराचा शहरातील सामाजिक संस्था व वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. तर काही संस्था, संघटना व वृक्षप्रेमींनी शनिवारी याच झाडांभोवती चिपको आंदोलन केले होते.

Mula-Mutha River
Mumbai Agitation : वांद्रेतील पटवर्धन पार्क वाचविण्यासाठी रहिवासी एकवटले; भूमिगत वाहनतळाला विरोध

दरम्यान, यापुर्वीही महापालिका प्रशासनाने तोडण्यात येणाऱ्या झाडांमध्ये झुडप प्रकारातील झाडांचा समावेश असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाने झाडांबाबतची आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. नदी सुधार प्रकल्पामध्ये 6 ते 7 हजार झाडे तोडली जाणार असल्याच्या चर्चेत तत्थ नाही. या प्रकल्पाअंतर्गत 10 किलोमीटरचा नदीकाठ विकसीत केला जात आहे. त्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 3 हजार झाडे काढण्यात येणार आहे.

काढण्यात येणारी सर्व वृक्ष ही झुडूप या प्रकारात मोडतात. तसेच या प्रकल्पात स्थानिक प्रजातीची कोणतीही झाडे काढली जाणार नसल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुख म्हणाले, "" प्रकल्पामध्ये काढण्यात येणाऱ्या तीन हजार वृक्षांमध्ये झुडुप प्रजातीमधील सुबाभूळ, कुबाभूळ यांचा समावेश आहे.

Mula-Mutha River
Mumbai Metro : नवीन मार्गाची सिडको करणार उभारणी;दोन्‍ही विमानतळांना जोडणार मेट्रो सेवा

या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. तसेच या प्रकल्पामध्ये जेथे झाड काढण्याची गरज आहे, तेथीलच झुडुप प्रजातीमधील झाड काढले जाणार आहे. तर इतर झाडांचे पुर्नरोपण केले जाणार आहे.'' देशमुख यांनी याबाबत तयार केलेला व्हिडीओ महापालिकेने प्रसारीत केला आहे.

दीकाठी लागणार पक्षी, वन्यप्राण्यांसाठी उपयुक्त झाडे

पुणे महानगरपालिकेतर्फे स्थानिक प्रजातीची 60 ते 65 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. बंगळुरु येथील वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. संबंधित संस्थेतील तज्ज्ञांनी नदीच्याकडेला कुठली झाडे असली पाहीजेत.

याचा तांत्रिक अभ्यास केला आहे. त्यानुसार संबंधित झाडे लावली जाणार आहेत. त्यामध्ये सावली देणारे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी व नदीला पूरक अशी प्रकारांमधील वृक्ष लावले जाणार आहेत. त्यांची निगा राखण्याचेही काम केले जाणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com