Pune News : मुळामुठा नदी काठ सुधारच्या कामाला गती

मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पाअंतर्गत प्राधान्याने केल्या जाणाऱ्या बंडगार्डन येथील ३०० मीटर अंतराचे काम वेगात पूर्ण करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Mulamutha river bank improvement work
Mulamutha river bank improvement worksakal
Summary

Mulamutha river bank improvement work

पुणे - मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पाअंतर्गत प्राधान्याने केल्या जाणाऱ्या बंडगार्डन येथील ३०० मीटर अंतराचे काम वेगात पूर्ण करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्याभरात ‘जी २०’ परिषदेपूर्वी हे उर्वरित काम पूर्ण करा असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

पुणे महापालिकेतर्फे शहरातून वाहणाऱ्या मुळामुठा नदीचा ४४ किलोमीटरचा काठ सुशोभित करण्यासाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. मार्च २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल अशा टोन टप्प्यात काम सुरू आहे.

संगमवाडी ते बंडगार्डन पूल दोन काठावर प्रत्येकी ३.६ किलोमीटरच्या सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ३० महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. हा टप्पा पूर्ण होण्यास अडीच वर्ष लागणार आहेत. परंतु नदी काढ सुधार प्रकल्प म्हणजे नेमके काय असणार, त्यात कोणत्या सुविधा असणार, नदीपात्रात बांधकाम होणार का याबद्दलचे गैरसमज दूर करणे व माहिती मिळणे यासाठी प्राधान्याने ३०० मीटरचा एक टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या काम सुरू आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात ‘जी २०’ परिषदेनिमित्त अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती पुण्यात येणार आहेत. त्यांना हा ३०० मीटरच्या टप्प्याचे काम दाखवून भविष्यात पुण्यातील नदी सुशोभित कशी असेल याचे चित्र मांडता येणार आहे. त्यामुळे वेगात काम करण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आज आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता युवराज देशमुख यांनी कामाची पाहणी करून आढावा घेतला.

यापद्धतीने सुरू आहे काम

- नदी काढ विकसित करताना गॅबियन भिंत बांधली जात आहे.

- त्यासाठी भूमीगत मेट्रोचे काम करताना निघालेला दगड वापरला जात आहे

- गॅबियन भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पादचारी मार्ग, सायकल मार्ग व इतर सुविधांचे काम सुरू

- नदीपात्रातील झाड, गवत यांचे सर्वेक्षण पूर्ण

- नदीपात्रात शोभेची झाडे न लावता फळ, फूल येणारी, प्राण्यांसाठी उपयुक्त, सावली देणारी झाडे लावली जाणार

‘जानेवारी महिन्यात जी २० परिषद होणार असून, त्यापूर्वी नदीकाठ सुधारचा ३०० मीटरचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. भविष्यात पुण्यातील नदी कशी सुंदर दिसेल हे पाहुण्यांना आणि पुणेकरांनाही दाखवता येणार आहे.’

- विक्रम कुमार, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com