

Pune Mumbai direct flight service not available
sakal
पुणे : पुणे व मुंबई या दोन शहरांना जोडणारी विमानसेवाच नाही. दोन वर्षांपूर्वी वेळ चुकीची असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभला म्हणून एअर इंडियाने विमानसेवा बंद केली. ती आजतागायत बंदच आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना एकमेव आधार तो द्रुतगती मार्गाचा. मात्र, बुधवारच्या वाहतूक कोंडीचा विचार करता, या मार्गवरचा विश्वासही डळमळीत झाला. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या दोन शहरांना जोडणारी विमानसेवा अस्तित्वात नसणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.