पुणे-मुंबई 'एक्‍स्प्रेस-वे'वर लहान वाहनांसाठी स्वतंत्र लेन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

खालापूर ते कुसगावदरम्यान सेवा; "व्हाइट बॅरिअर'चा वापर

पुणे: पुणे-मुंबई "एक्‍स्प्रेस-वे'वर खालापूर ते कुसगाव टोल नाक्‍यादरम्यानच्या खंडाळा घाटात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक लेन लहान वाहनांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी "व्हाइट बॅरिअर'चा वापर करण्यात येणार आहे.

महामार्ग पोलिस दलाचे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून लहान वाहनांसाठी लोणावळा-खंडाळा घाटात एक स्वतंत्र लेन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उजव्या बाजूची लेन पूर्णतः राखून ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महामार्ग पोलिसांनी एक्‍स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी "गोल्डन अवर्स'चा प्रयोग केला होता. जड वाहनांमुळे लहान वाहनांचा वेग खुंटतो आणि पर्यायाने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी त्यांनी सलग जोडून सुटी असेल तेव्हा जड वाहनांना ठराविक काळासाठी "एक्‍स्प्रेस-वे'वर बंदी घालण्याचा प्रयोग राबविण्यात आला. लहान वाहनांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली होती. हे उपाय करूनदेखील खंडाळा घाटात जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची समस्या सुटलेली नाही. यावर पर्याय काढण्यासाठी हाईट बॅरिअरचा पर्याय पोलिसांनी निवडला आहे. त्याची चाचणी खालापूर टोल नाक्‍यावर घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर खालापूर ते कुसगाव टोल नाका यादरम्यान बॅरिअर बसविण्यात येणार आहे.

"हाइट बॅरिअर'ची चाचणी
लहान वाहनांसाठीच्या स्वतंत्र लेनमध्ये जड वाहनांना प्रतिबंध केल्यास घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होईल, असा पोलिसांचा दावा आहे. त्यासाठी खालापूर टोल नाक्‍यावर सोमवारी या "हाइट बॅरिअर'ची चाचणीही घेण्यात आली. या बॅरिअरमुळे पहिल्या लेनमधून केवळ लहान वाहनेच जाऊ शकणार आहेत. या "हाइट बॅरिअर'खालून ऍम्बुलन्स जाऊ शकतील, याचाही विचार केला आहे.

Web Title: pune-mumbai express highway special lane