

Heavy rainfall triggers landslides on Pune-Mumbai Expressway
esakal
पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे 'मिसिंग लिंक'वर दरड कोसळून गळती झाली आहे. इंद्रायणी नदीत पुरस्थिती निर्माण झाली असून आळंदीतील मंदिर परिसरात आणि दुकानांतही पाणी शिरले आहे.