
मागील काही वेळापासून गाड्यांच्या रांगा लागल्या असून प्रवासी त्रस्त झाले आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; आता कारण ठरलं...
पुणे - पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्याहून मुंबईला जाताना पहिल्याच बोगद्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी पावणे सात वाजल्यापासून ही वाहतूक थांबलेली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु मदतीसाठी एकही वाहतूक पोलिसही रस्त्यावर दिसत नसल्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे मागील काही वेळापासून गाड्यांच्या रांगा लागल्या असून प्रवासी त्रस्त झाले आहे.
हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'
दरम्यान, एक्सप्रेस वेवरवरील या घाटात काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून एकच वाहन पुढे जात आहे. परिणामी वाहन कोंडी झाल्याचे दिसून येते आहे. या हायवेवरील वाहतूक मंद गतीने वाहतूक सुरू झाली आहे. घाटात काम सुरू असून काही वेळापूर्वी तिथे एक कंटेनर पलटी झाला होता, अशीही माहिती मिळत आहे. आता हा पटली झालेला कंटेनर बाजूला केला असून वाहतूक मंद गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे चालकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Web Title: Pune Mumbai Expressway Lonavala First Tunnel Working In Ghat Section Traffic Jam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..