

Flight Ticket Pune Mumbai
esakal
Indigo Airline Fligh Cancel : इंडिगो एअरलाईन्सच्या सतत सुरू असलेल्या ऑपरेशनल समस्यांमुळे देशभरातील हवाई वाहतूक गुरुवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर झाला आहे. पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बेंगलोरकडे जाणाऱ्या विमान प्रवासासाठीचे तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. दहापट दराने तिकिटांची विक्री सुरू असल्याने प्रवाशांना आर्थीक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.