Pune : सिंहगड एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

गेल्या १९ महिन्यांपासून ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती
sinhgad express
sinhgad expresssakal media

पुणे : पुणे- मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस येत्या सोमवारपासून (ता. १८) सुरू होणार आहे. गेल्या १९ महिन्यांपासून ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.

sinhgad express
शरद पवार यांचा न्यायालयांवर विश्वास आहे की नाही? - फडणवीस

पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

sinhgad express
T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची 'टीम इंडिया'मध्ये एन्ट्री!!

या बाबत रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी देहरोडला थांबा आवश्यक आहे. तसेच तळेगावच्या प्रवाशांनाही मुंबईत नोकरी व्यवसायासाठी पोचण्यासाठी ही गाडी आवश्यक आहे. त्यामुळे ही रेल्वे तळेगाव स्थानकावरही थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.’’ या गाडीचे आरक्षण खुले झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com