राज्यातील एकल शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा प्राधान्याने विचार करू - हसन मुश्रीफ

मुंबई - मंत्रालयात एकल शिक्षकांच्या समस्या विषयी चर्चा करताना मंत्री हसन मुश्रीफ व आमदार रोहित पवार.
मुंबई - मंत्रालयात एकल शिक्षकांच्या समस्या विषयी चर्चा करताना मंत्री हसन मुश्रीफ व आमदार रोहित पवार.

तळेगाव ढमढेरे - राज्यातील एकल शिक्षकांच्या मागण्या चर्चा करून प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने नुकतीच मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात शिष्टमंडळासह भेट घेतली. एकल शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्याध्यक्ष  एल. पी. नरसाळे यांनी केले.

यावेळी एकल शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या बरोबर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर चर्चा केली व एकल शिक्षकांची बाजू मांडून, शिक्षकांना दिलासा दिला. 

आगामी काळात येणारे सर्वसमावेशक परिपत्रक (जीआर) हे एकलला योग्य न्याय देईल असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले. 

कोकणातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली बाबत भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी थोड्याच दिवसात भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पुढील परिपत्रका (जीआर )मध्ये एकलला समान न्याय मिळावा यासाठी मंत्री व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत लवकरच मंत्रालयात एकल शिष्टमंडळाला विचारविनिमय करण्यासाठी वेळ देण्याचे यावेळी सांगण्यात आले. 

संवर्ग पद्धतीने एकच समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये ४ गट पडल्यामुळे संवर्ग पद्धती रद्द करून फक्त वास्तव सेवाज्येष्ठतेनेच बदल्या कराव्यात. तसेच निव्वळ पुरुषच नव्हे तर बहुसंख्य एकल महिला देखील आहेत, त्यांच्या समस्याही खूप गंभीर आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिले.

शिक्षकांच्या सर्व समस्या समजून घेऊन मंत्री व आमदार रोहित पवार यांनी सेवाज्येष्ठतेवर आधारित सर्वसमावेशक धोरण ठरवण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी राज्याध्यक्ष लक्ष्मण नरसाळे, विभागीय अध्यक्ष विकास उचाळे, जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेसे, राजेंद्र गरुड, सुरेश राजगुरू, मारुती निकम, वैशाली भंडारी, पल्लवी गायकवाड, संतोष तिखे, अनिलकुमार कांबळे, मनीषा ननावरे, दत्तात्रय भोसले, वनिता जगदाळे, शरद मचाले, वंदना गोरे आदी राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com