esakal | पुणे : महत्वकांशी ॲमेनिटी स्पेसच्या प्रस्तावावरून भाजपमध्ये मतभेद ?
sakal

बोलून बातमी शोधा

pune corporation file photo

पुणे : महत्वकांशी ॲमेनिटी स्पेसच्या प्रस्तावावरून भाजपमध्ये मतभेद ?

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरातील २७० ॲमेनटीस स्पेस भाड्याने देऊन १७५२ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचा भाजपचा (Bjp) महत्वकांक्षी प्रस्ताव आज महापालिकेच्या (pune corporation) मुख्यसभेत मंजूर होणे अपेक्षीत होते. मात्र, आता पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद निर्माण झाल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुख्यसभा तहकूब करण्याची नामुष्की आली. यावर राष्ट्रवादीने (ncp) हा भाजपचा रडीचा डाव आहे असा आरोप केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील २७० ॲमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) दीर्घमुदतीने भाड्याने देण्याचा विषय चर्चेत आहे. हा प्रस्ताव मंजूर करणार असा पवित्रा भाजपने घेतला आहे. तर राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी यास विरोध केला आहे. या प्रस्तावावर आज चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षीत होते, भाजपने यासाठी व्हीप देखील बजावला होता. त्याच प्रमाणे स्वारगेट कात्रज भूयारी मेट्रो, स्वच्छ संस्थेला कचरा संकलनाचे काम देणे, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, निरगुडी गावाचा महापालिकेत समावेश करण्यास विरोध यासह इतर प्रस्ताव होते.

मुख्यसभा सुरू होण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या मुद्द्यावरून वाद झाले. एकीकडे विरोधक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे पक्षात धुसफूस सुरू झाल्याने यावर तोडगा काढणे अवघड झाले. हा वाद वरिष्ठ नेत्यांपार्यंत गेल्याचेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेची मुख्यसभा ऑफलाइन झालेली असताना भाजपने तहकुबी मांडली, त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी विरोध करत शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे विषय आज कार्यपत्रिकेवर आहेत, शासनाने ऑफलाइन सभा घेण्याची परवानगी दिली आहे तर आज चर्चा करा अशी भूमिका मांडत टीका केली. त्यावर महापौरांनी पुढील सभेत यावर चर्चा करू असे उत्तर दिले.

हेही वाचा: BAN vs NZ : बांगलादेशच्या वाघांनी केली किवींची शिकार

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘‘मुख्यसभा ऑफलाइन होत असताना त्यामध्ये शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षीत होते, पण भाजपमध्ये ॲमेनिटी स्पेस, फ्लॅटविक्रीवरून मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी सभा तहकूब केली.भाजपने आज रडीचा डाव खेळला आहे.’’

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात ४,१७४ रुग्णांची नोंद

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा रोज एक पदाधिकारी वेगळी भूमिका मांडत असतात, असे भाजपमध्ये होत नाही. आमचे धोरण व भूमिका स्पष्ट आहे. आमच्यात मतभेद नाहीत. आजची सभा डेक्कन येथे मेट्रोच्या कामाबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. तसेच मेट्रोचा प्रस्ताव देखील होता. पण त्यावर चर्चा करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी नसल्याने सभा तहकूब केली आहे.’’

- गणेश बीडकर, सभागृहनेते

loading image
go to top