Pune : पालिकेच्या कचरा गाडीला मागून धडकून चालकाचा मृत्यू

या प्रकरणी कचरा ट्रक चालक अमोल कैलास गायकवाड वय ३८ वर्षे राहणार घर नंबर ५५८ दत्तवाडी पुणे हा पालिकेची गाडी चालवत होता
pune corporation van
pune corporation vansakal

मुंढवा : मुंढवा-घोरपडी रस्त्यावरील कचरे वस्ती, सुभाष घई बंगल्याजवळ, शुक्रवार रात्री ३.३० वाजेच्या सुमारास, पुणे महानगर पालिकेचा कचरा सफाई करणारा ट्रक रस्त्याच्या कडेची सफाई करत असतांना, त्याला पाठीमागून स्विफ्ट कार धडकून त्यात स्विफ्ट कार चालकाचा मृत्यू झाला.

pune corporation van
Drug case: आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक ८ आक्टो रोजी रात्री ३.३० वाजेच्या सुमारास पालिकेचा रस्ता सफाई करणारा एम.एच.१२ क्यू. डब्ल्यू. ५२१० नंबरचा ट्रक सुभाष घई बंगल्याच्या समोरील रस्त्याची सफाई करत पुढे चालला होता. त्याला पाठीमागुन जोराने आलेली स्विफ्ट कार नंबर एम. एच. १२ एस.ऐक्स. ३१०२ ही धडकून त्यात प्रशांत जगन्नाथ भुजबळ (वर्ष ३०) सध्या राहणार सर्वे नंबर १०३ गांधी नगर, येरवडा, मुळ राहणार मु. पोस्ट कोंड ता. जिल्हा उस्मानाबाद हा याला गंभीर दुखापत झाली. त्याला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

pune corporation van
टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी

या प्रकरणी कचरा ट्रक चालक अमोल कैलास गायकवाड वय ३८ वर्षे राहणार घर नंबर ५५८ दत्तवाडी पुणे हा पालिकेची गाडी चालवत होता. याप्रकरणी प्रशांत जगन्नाथ भुजबळ याची सर्वस्वी चुक मानून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक गजानन भोसले करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com