esakal | Drug case: आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

aryan khan Arbaaz Merchant

Drug case: आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drug case) अटकेत असलेल्या आर्यन खान, (aryan khan) अरबाज मर्चट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज (bail application) शुक्रवारी न्यायालयाने (court) फेटाळला आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी आता सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. आर्यन सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. गुरुवारी आर्यन खान आणि अन्य सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशीसाठी कोठडी वाढवून देण्याची एनसीबीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

शनिवारी एनसीबीने कॉर्डीलिया क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असताना छापा मारुन आर्यनसह आठ जणांना अटक केली होती. काही आरोपींकडे ड्रग्ज आढळले होते. १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, २२ एमडीएमएच्या गोळ्या, पाच ग्रॅम एमडी आणि रोख रक्कम १.३३ लाख रुपये छाप्याच्यावेळी जप्त केले होते. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत एकूण १८ जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना आर्थर रोड कारागृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र तरीही कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते.

हेही वाचा: दहशतवाद्यांचे दिवस भरले, अमित शहांचा मास्टरप्लान तयार

त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. आर्यन आणि अरबाजमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांना त्यात कोठडीत ठेवलं जाईल. सध्या आर्यन आणि अरबाज यांना नवीन कारागृहातील पहिल्या माळ्यावरील बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर आरोपी मुनमुन धामेचा हिला भायखळा कारागृहात हलवण्यात आले आहे.

loading image
go to top