

Amedia Takes No Action on Cancellation
Sakal
पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अमेडिया एंटरप्राइझेस या कंपनीने खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात मंगळवारपर्यंत त्यादृष्टीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला बजाविलेल्या नोटिशीत १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीच्या आत कंपनीला त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा कंपनीपुढील अडचणीत वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.