Scam Unveiled in Mundhwa Land Deal
Sakal
पुणे
Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर
Scam Unveiled in Mundhwa Land Deal : मुंढव्यातील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात दस्तनोंदणीसाठी जुना बंद सातबारा वापरून आणि ई-फेरफारसाठी 'जंगम मालमत्ता' पर्याय निवडून नियमांना कशा प्रकारे बगल दिली गेली, हे मुठे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पुणे : मुंढव्यातील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात अनेक नियमांना कशा प्रकारे बगल देण्यात आली आहे, हे मुठे समितीच्या अहवालावरून समोर आले आहे. दस्तनोंदणी करताना बंद झालेला जुना सातबारा उतारा जोडण्यात आला होता. हे उघडकीस येऊ नये, यासाठी दस्तनोंदणी झाल्यानंतर तो ऑनलाइन ई-म्युटेशनसाठी (ई-फेरफार) पाठविताना जंगम मालमत्तेचा पर्याय निवडण्यात आल्याचे समोर आले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘स्कीप’चा पर्याय आहे. मात्र सह दुय्यम निबंधकांनी त्याचा वापर गैरव्यवहारासाठी केला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

