

Mundhwa Land Scam: Fraud Attempt Exposed
Sakal
पुणे : मुंढवा येथील शासकीय जागेचा नजराणा न भरताही तो भरला आहे, असे पत्र शीतल तेजवानी व अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीने जिल्हा प्रशासनाला देऊन फसविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे ते तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर येवले यांनी पुढे हा सगळा ‘उद्योग’ केला असल्याचे समोर आले आहे.