

Mundhwa Land Scam Report Due Soon
Sakal
पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शीतल तेजवानी यांना नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र त्या हजर न राहिल्याने आता त्यांना संधी देणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.