आंदोलनांचा गोंधळ आता महापालिकेच्या हिरवळीवर

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी महापालिका भवनाच्या आवारातील हिरवळीवर आंदोलन करावे, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत सोमवारी झाला.

विविध संस्था, संघटना त्यांच्या मागण्यांसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलने करतात. यामुळे वाहतूक कोंडी होते, तर राजकीय पक्ष सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृहाबाहेर ठिय्या मारून आंदोलने करतात. यामुळे सभागृहातील कामात अडथळा होतो. काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या झालेल्या आंदोलनात महिला अधिकाऱ्याशी चुकीच्या पद्धतीने चर्चा केल्याचाही प्रकार घडला होता. या पार्श्‍वभूमीवर हा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत आला होता.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, 'इमारतीमध्ये कोणालाही आंदोलन करता येणार नाही. महापालिका भवनामध्ये येणाऱ्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गेटपास देण्याचाही निर्णय पक्षनेत्यांनी एकमताने घेतला आहे.''

उड्डाण पुलाखाली पुतळ्यांना मनाई
शहरात उड्डाण पुलांखाली मोठ्या व्यक्तींचे पुतळे, तैलचित्रे लावली जात आहेत. यापुढे असे पुतळे बसविण्यास मनाई करण्यात आली आहे. जलयुक्त शहर अभियान आणि रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यासाठी समिती स्थापन करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे' पुरस्कार सुरू ठेवून नवीन धोरणानुसार शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, असा निर्णयही बैठकीत घेतल्याचे टिळक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com