PMP : पुणे महापालिका पीएमपीला देणार २०० कोटी रुपये

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट भरून काढण्यासाठी २०० कोटी रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.
Pune Municipal Corporation and PMP
Pune Municipal Corporation and PMPSakal

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट भरून काढण्यासाठी २०० कोटी रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. अजूनही पुणे महापालिकेला २१७ कोटीची रक्कम पुढील काही महिन्यात द्यावी लागणार आहे.

पीएमपी कंपनी स्थापन होताना त्यामध्ये पीएमपीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महापालिकेने ६० टक्के तर पिंपरी चिंचवड महापालिकेने ४० टक्के भार उचलावा असा करार झालेला आहे. पीएमपीला २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ६९६ कोटी ५० लाख रुपयांची संचलनात तूट आली आहे.

Pune Municipal Corporation and PMP
MLA Atul Benake : कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या निर्णयाचा निषेध

त्यानुसार पुणे महापालिकेला ६० टक्के म्हणजे ४१७ कोटी ९० लाख रुपये पीएमपीला देणे आहे. त्यातील २०० कोटी रुपयांची पहिली उचल देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे होता. त्यानुसार स्थायीने मंजुरी दिली.

पीएमपीला अजून २१७ कोटी रुपये पुणे महापालिकेने देणे असून, २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी द्यावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com