

BJP corporators' 5 crore development fund diverted mutuall
Sakal
पुणे : महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक २२ कासेवाडी-डायस प्लॉटमधील विकासकामांसाठी तरतूद केलेला पाच कोटी रुपयांचा निधी स्थायी समितीने परस्पर प्रभाग क्रमांक २३ ड रविवार पेठ-नाना पेठेत वळविला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय घेताना पाळलेल्या गुप्ततेमुळे संबंधित प्रभागातील भाजप व काँग्रेस नगरसेवक पूर्णपणे अंधारात होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्येच नाराजीनाट्य सुरू झाले असून, ऐन दिवाळीत पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे.