Pune News : कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी उपोषण

पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस, सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
RMS Agitation
RMS Agitationsakal

पुणे - महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस, सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या यांनी दिला आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनाला महानगरपालिकेतील सुरक्षा, पाणीपुरवठा, कीटकनाशक, आरोग्य विभाग, स्मशानभूमी, चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात सुमारे ३०० कामगार सहभागी झाले. दरम्यान, आज दिवसभरामध्ये प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही.

कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे शिंदे यांच्याशी संपर्क साधून प्रश्न समजावून घेतले. त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व निरीक्षक पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस. के. पळसे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com