Pune Crime : महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीय पंथी सुरक्षा रक्षकास मारहाण

पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपअभियंत्याला ओळखपत्राबाबत चौकशी केल्याने त्यांनी तीन तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली असल्याची घटना घडली.
Crime
Crimeesakal

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपअभियंत्याला ओळखपत्राबाबत चौकशी केल्याने त्यांनी तीन तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली असल्याची घटना आज (ता. २४) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व संघटनांनी मध्यस्ती करून या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे महापालिकेने ५० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर या तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. आज दुपारी उपअभियंता महापालिकेत आलेला असताना एका तृतीय पंथी सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यावर शिविगाळ करत मी ३० वर्ष झालो महापालिकेत आहे, मला ओळखत नाहीस का असे म्हणत मारहाण केली. तिच्या मदतीसाठी आलेल्या आणखी दोघींनाही मारले.

सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी उपअभियंत्याला पकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले, पण महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटनांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव आणल्याने कारवाई टळली आहे.

दरम्यान, यासंदर्भात उपायुक्त प्रतिभा पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करावा, संबंधित उपअभियंत्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सुरक्षा रक्षकांना दिले असल्याचे विटकर यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यालाही केली होती मारहाण

याच उपअभियंत्याने वैकुंठ स्मशानभूमीत महापालिकेतील एका विभाग प्रमुखाला मारहाण केली होती, त्याप्रकरणात त्यास निलंबित केले होते. जानेवारी महिन्यात पुन्हा सेवेत घेण्यात आल्यानंतर आता तीन तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com