पुणे महापालिकेला डिसेंबरमध्ये मिळणार 77 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे - स्थानिक संस्था कराच्या सवलतींपोटी महापालिकांच्या उत्पन्नात निर्माण होणारी तूट भरुन काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसंकल्पीय तरतुदींतून डिसेंबर महिन्यासाठी विविध महापालिकांकरीता 444 कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान देण्य़ात येणार आहे. डिसेंबर महिन्यासाठी देण्यात येणाऱ्या या अनुदानाच्या रकमा शासनाने जाहीर केल्या असून पुणे महापालिकेच्या वाट्याला 77 कोटी 95 लाख रुपये आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेला 61 कोटी 94 लाखांचे अनुदान मिळणार आहे. 

राज्य शासनाने वार्षिक 50 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना 1 आॅगस्ट 2015 रोजीच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य करामध्ये (एलबीटी) सूट दिली होती. पूर्वी जकात हे महापालिकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. या जकातीची जागा एलबीटीने घेतली. मात्र, शासनाच्या सूट देण्याच्या निर्णयामुळे महापालिकांना आपल्या उत्पन्नात तूट येऊ लागली. ही तूट भरून काढण्यासाठी मुद्रांक शुल्क अधिभारातून मिळणाऱ्या एक टक्क्याची रक्कम आणि 50 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांकडून मिळणारे स्थानिक करापासूनचे उत्पन्न हे दोन स्त्रोत महापालिकांकडे उपलब्ध होते. 

या करातून मिळणारे उत्पन्न आणि 2016-17 या आर्थिक वर्षातले संभाव्य उत्पन्न यातील तूट भरुन काढण्यासाठी शासन अर्थसंकल्पीय तरतुदीतून अनुदान देणार आहे. शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानुसार ही रक्कम संबंधित महापालिकांना मिळणार आहे. डिसेंबर 2016 साठी जाहीर केलेल्या अऩुदानाच्या रकमा खालील प्रमाणे आहेत, 

मीरा भायंदर - 11 कोटी 61 लाख
वसई-विरार - 16 कोटी 52 लाख
सोलापूर - 13 कोटी 84 लाख
कोल्हापूर - 7 कोटी 22 लाख
जळगांव - 6 कोटी 65 लाख
औरंगाबाद- 13 कोटी 81 लाख
नांदेड- वाघाळा - 4 कोटी 24 लाख
परभणी - 1 कोटी 30 लाख
लातूर - 84 लाख
कल्याण डोंबिवली - 10 कोटी 53 लाख
उल्हासनगर - 11 कोटी 32 लाख
चंद्रपूर - 3 कोटी 67 लाख
अमरावती - 7 कोटी 27 लाख
अकोला - 3 कोटी 63 लाख
सांगली-कुपवाड-मिरज - 9 कोटी 5 लाख
पुणे - 77 कोटी 95 लाख
पिंपरी-चिंचवड 61 कोटी 94 लाख
ठाणे - 35 कोटी 78 लाख
नाशिक - 31 कोटी 64 लाख
मालेंगाव - 10 कोटी 28 लाख
नवी मुंबई - 37 कोटी 9 लाख 
भिवंडी-निजामपूर - 15 कोटी 42 लाख
नागपूर-ज 40 कोटी 64 लाख
अहमदनगर - 5 कोटी 44 लाख
धुळे - 6 कोटी 54 लाख

Web Title: pune municipal corporation gets fund