
शहरातील सुमारे 30 ते 32 लाख लोकसंख्येसाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी वर्षाकाठी तब्बल 350 कोटी रुपयांचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही आरोग्य व्यवस्थेतील विशेषत: रुग्णालयांतील उपचार सुविधांपासून शहरी गरीब योजना, अंशदायी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आक्षेप घेतले जातात. त्यातही कोरोनाच्या काळातही महापालिकेकडे पुरेसे बेड, ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभाग नसल्याने गरीब रुग्णांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर या आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पुणे : कोरोनाने पुणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेवर प्रश्न उभे केल्यानंतर या व्यवस्थेर्चे 'पोस्टमार्टेम' करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या खात्याकडचा निधी, निविदांवरील खर्च, ठेकेदारी, त्याचे परिणाम आणि प्रत्यक्षातील सेवांचा दर्जा,या बाबी तपासण्यात येणार सून, त्यात त्रुटी आढल्यास दोषींवर कारवाईसोबत यंत्रणेत लगेचच बदल केले जाणार आहेत. परिणामी, आरोग्य व्यवस्थेची परिणामकारकता आणि व्यापकता वाढविण्याचा महापालिकेचा उद्देश आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील सुमारे 30 ते 32 लाख लोकसंख्येसाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी वर्षाकाठी तब्बल 350 कोटी रुपयांचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही आरोग्य व्यवस्थेतील विशेषत: रुग्णालयांतील उपचार सुविधांपासून शहरी गरीब योजना, अंशदायी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आक्षेप घेतले जातात. त्यातही कोरोनाच्या काळातही महापालिकेकडे पुरेसे बेड, ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभाग नसल्याने गरीब रुग्णांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर या आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार नेमका निधी कुठे आणि किती वापरला जातो, त्यातील खरेदीची प्रक्रिया, साहित्याचा दर्जा, यावर नजर ठेवली जाणार आहे.
चेन्नईतील स्वयंसेवकाची समस्या लसीशी निगडित नाही; सिरम इंस्टिट्यूटचा दावा
शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात दवाखाने आणि अन्य आरोग्य व्यवस्थांची उभारणी अपेक्षित आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे ठरविक भागांत दवाखाने सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. त्याची पाहणी करून नव्या नियोजनात सर्व परिसरांत दवाखाने, आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात वाटेल, तेथे दवाखाने सुरू करता येणार नाहीत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
नव्या वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच येत्या शैक्षणिक वर्षांत सुरू असल्याने त्यासाठी सुमारे 594 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात प्राध्यपकांची भरती करण्यात येणार असून, पुढील महिन्यात त्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील सणस शाळेत वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्ग भरणार आहेत. त्यासाठी शाळेत आवश्यक ती कामे करण्यात येत आहेत.
ह्रदय हेलावून टाकणारी घटना; खेळताना विहीरीत पडून 3 वर्षाच्या अधिराजने गमावला जीव
''पुणे शहराची हद्द आणि त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्याची सेवा-सुविधांची उभारणी केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक घटकाला मोफत आणि आवश्यक ती उपचार व्यवस्था उपलब्ध होईल. त्यासाठी नव्याने आराखडा तयार करीत आहोत.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका