पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याचा बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार असून, त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे.