
पुणे महापालिकेत राडा; महापौर कार्यालयाच्या फलकावर फेकली शाई
पुणे महापालिकेमध्ये राडा झाला असून महापौर कार्यालयाच्या फलकावर काळी शाई फेकण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामुळं पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation Ink thrown on the mayor office board)
हेही वाचा: विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : मविआचे मंत्री घेणार राज्यपालांची भेट
पुणे महानगर पालिकेतील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग आज तुटल्याची घटना घडल्याने हा वादंग झाला. या पुतळ्याभोवती असलेलं डेकोरेशन खाली उतरवताना ही घटना घडली. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध करत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरील फलकावर शाई फेकली.
पुणे महानगरपालिकेनं या पुतळ्याचं काम घाई-गडबडीत केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
Web Title: Pune Municipal Corporation Ink Thrown On The Mayor Office Board
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..