पुणे : घरातील फरशीला फुटले दुर्गंधीयुक्त पाण्याचे झरे

रजपूत झोपडपट्टी परिसरातील नागरिक त्रस्त
Pune kothrud slum area Citizens
Pune kothrud slum area Citizens

कोथरुड : एरंडवणा येथील रजपूत झोपडपट्टी परिसरातील घरच्या फरशातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने येथील रहीवाशांचा रविवार घरातील पाणी उपसण्यात गेला. ड्रेनेज सफाई नसल्याने हे पाणी घरात आल्याचा आरोप रहीवाशांनी केला. जलवाहीनी वा पाण्याच्या टाकीतील गळतीमुळे असे घडले असावे असे आरोग्य विभागाच्या लोकांनी सांगितले. रजपूत झोपडपट्टीतील विमल खापरे, भालचंद्र नेटके, भरत खापरे, रमेश पांडव, मेघा महाडीक, कलाबाई रांजणे, संदीप कुले, शशिकांत गटणे, मंगल कदम, विलास खोल्लम, सुनिता शिगवण यांच्या घरातील फरशीमधून सकाळ पासून पाणी यायला लागले.

त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. घरात स्वयंपाक वा इतर कामे देखिल करता येत नव्हते अशी परिस्थिती झाली. पाऊस नसताना हे घडत असल्याने येथील रहीवाशांना मोठा धक्का बसला. भालचंद्र नेटके म्हणाले की, आज रविवार असल्याने आम्ही घरीच आहोत. त्यामुळे घरातील फरशीतून मोठ्या प्रमाणात येणारे हे पाणी उपसून बाहेर टाकत आहोत. कामावर असताना असे घडले तर घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले असते. आत्ताही आम्हाला घरात स्वयंपाक करता आलेला नाही. लहान मुलांनी अशा परिस्थितीत काय केले असते.

शंतनु खिलारे म्हणाले की, ड्रेनेज सफाईची कामे केली नसल्यामुळे हे घडले असावे. महानगरपालिकेने नालेसफाईची कामे व्यवस्थित करावीत. ही कामे व्यवस्थित झाली असती तर घरातून ड्रेनेजचे पाणी वाहण्याची वेळ आली नसती. महापालिकेचे अभियंता विज्ञान गायकवाड म्हणाले की, ड्रेनेज वाहीनी पातळी खालच्या बाजूला घरे असतील तर असे घडू शकते. आम्ही पाहणी करुन योग्य ती कारवाई करतो.

आरोग्य निरिक्षक गणेश खिरीड म्हणाले की, तक्रार प्राप्त झाल्यावर आमच्या कर्मचा-यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परंतु हे पाणी या वस्तीच्या लगत असलेल्या पाटील रेजन्सी सोसायटीच्या सीमाभिंतीतून पाझरत असल्याचे दिसते. सोसायटीच्या टाकीची गळती अथवा एखादी जलवाहीनी फुटली असल्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या घरातून पाणी बाहरे आले असावे. आम्ही पाणी पुरवठा विभागाला कळवले आहे. दरम्यान या समस्येतून प्रथम आमची सुटका करा. घरातून पाणी कसे बाहेर येतेय याचा शोध घ्या अशी मागणी येथील रहिवाशांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com