

Pune Parking Contractors Charge Five Times the Fixed Rate
Sakal
पुणे : शहरामध्ये विविध कामे व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या वाहनतळावर वाहने लावण्यासाठी (पार्किंग) मोटारींना ६० ते ७० रुपये, तर दुचाकीसाठी २० ते ३० रुपये प्रतितास मोजण्याची वेळ आली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दराच्या दुप्पट-तिप्पट नव्हे, तर तब्बल पाचपट जादा शुल्क आकारून ठेकेदारांकडून नागरिकांची लूट होत आहे. तरीही महापालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे.