

PMC Draft Electoral Roll Out
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी गुरुवारी (ता. २०) जाहीर झाली असून, एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार मतदान करू शकणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ सूस-बाणेर-पाषाण हा सर्वाधिक एक लाख ६० हजार २४२ मतदारांचा आहे. सर्वांत कमी ६२ हजार २०५ मतदार हे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर येथे आहेत. एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमधील मतदारसंख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.