

PMC Vows Action Against Parking Contractors
Sakal
पुणे : महापालिकेच्या वाहनतळांवर सर्वसामान्य पुणेकरांची आर्थिक लूट करणाऱ्या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारांना सध्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांचे काम बंद करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.