

Pune PMC Standing Committee Meeting Starts Hours Late Nilesh Nikam Raises Concerns Over Delays and Women Members Convenience
esakal
पुणे: पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सकाळी साडेअकरा वाजताची असते आणि बैठक प्रत्यक्षात दुपारी चार-पाच नंतर सुरू होत आहे. वेळेची शिस्त पाळली जात नसून, ती उशिरा सुरू करणे योग्य नाही. महिला सदस्यांना विनाकारण उशिरापर्यंत थांबावे लागत आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते निलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केली.