

Sakal Impact: PMC Pushes for Energy Conservation
Sakal
पुणे : पुणे महापालिकेचा वीज बिलावरचा वाढणारा खर्च कमी करून बचत वाढविण्यासाठी महाप्रित या शासकीय संस्थेला काम देण्यात आले आहे. पण गेल्या चार वर्षात कासव गतीने कामे केल्याने आत्तापर्यंत केवळ २१ हजार पथदिवे बदलले आहेत. मात्र, आता विद्युत विभागाने पाच क्षेत्रीय कार्यालयांचा प्रकल्प आराखडा एका महिन्याच्या आत सादर करा असे आदेश महाप्रितला दिले आहेत.