झाडे विद्रुपिकरणाविरोधातील सामाजिक संस्थांना महापालिकेचे पाठबळ

ज्ञानेश्वर भंडारे
मंगळवार, 24 जुलै 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) : अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था मागील चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील  विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहेत.याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे.जाहिरातदारांना तीन दिवसामध्ये जाहिराती काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.

अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांनी निगडी प्राधिकरण, संभाजीनगर, रस्टन कॉलनी, थेरगाव रस्त्यांवरील झाडांचे  जवळपास 10,000 खिळे काढलेले आहेत. यात 40 हुन अधिक सामाजिक संस्था सामील झाल्या आहेत.ट्री ऍक्ट नुसार झाडांना इजा करणे यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत.मागील महिन्यात माधव पाटील, सचिन काळभोर, अशोक तनपुरे, ऍड सोमनाथ हरपुडे, तुषार शिंदे,अनिल पालघर हे अंघोळीची गोळीचे शिष्टमंडळ महापालिका सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची भेट घेऊन झाडांवर जाहिरात बाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. प्रशासनाने याला उत्तम प्रतिसाद देत जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे.जाहिरातदारांना तीन दिवसामध्ये जाहिराती काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

खिळेमुक्त झाडे या चळवळीचे हे यश आहे आणि सर्व सामाजिक संघटना आणि माध्यमाचा सिंहाचा वाटा आहे.पिंपरी-चिंचवड मधील झाडांवरचा शेवटचा खिळे निघेपर्यंत हि चळवळ अशीच चालू राहील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकने उचलेले पाऊल नक्कीच अभिनंदनास्पद आहे आणि आता महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिकने याचे अनुकरण करावे.
- माधव पाटील, अध्यक्ष, अंघोळीची गोळी

Web Title: pune municipal corporation supports tree Disfiguration oppositions