
Pune Municipal Corporation
sakal
पुणे: पुणे महापालिकेतील हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स - टीडीआर) प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक महिने लागत होते, पण आता कमी कागदपत्रांसह ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. ९० दिवसांत ‘टीडीआर’ची फाइल मंजूर करायची, असे आदेश आयुक्त नवलकिशोर राम यांनी काढले आहेत. एक नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.