Pune Garbage : पुणे महापालिका तयार करणार कचऱ्यातून हायड्रोजन

पुणे महापालिकेने कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती, खत निर्मिती, बायोडिझेल निर्मिती केल्यानंतर आता रोज ३५० टन कचऱ्याचा वापर करून हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे - महापालिकेने कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती, खत निर्मिती, बायोडिझेल निर्मिती केल्यानंतर आता रोज ३५० टन कचऱ्याचा वापर करून हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासाठी 'द ग्रीन बिलियन्स लिमिटेड' या कंपनीसोबत करार केला आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी रिफ्यूज डेरिव्ह्ड फ्युएलच्या वापर केला जाईल. यासाठी प्लाझ्मा गॅसिफिकेशन या तंत्रज्ञानाच्या वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू यांच्या साह्याने विकसित केले गेले आहे.

महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत)या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाने या सुविधेतून निर्माण होणारा हायड्रोजन उचलण्याचा व हायड्रोजन वाहतुकीसाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी, महाप्रीतने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडसोबत भागीदारी करून पुण्यातील शहर गॅस वितरण साखळीमध्ये हायड्रोजन मिश्रणाचा प्रस्ताव ही दिला आहे.

कचऱ्यापासूनच हायड्रोजन तयार होतो आणि हा शहराच्या गॅस वितरण नेटवर्कमध्ये येत असल्याने यातून आर्थिक फायदही होणार आहे. या प्रकल्पामुळे २. ५ दशलक्ष मेट्रिक टन समान कार्बन डायऑक्साईड कमी होऊ शकतो आणि ३.८ दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा हा कचरा डेपोमध्ये न जाता या प्रकल्पामध्ये येईल. या कचऱ्यामध्ये बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल आणि घरगुती कचऱ्याचा समावेश असणार असल्याने सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील द ग्रीन बिलियन्सच्या सुविधेमध्ये त्याचे विलगीकरण केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com