Polling scheduled with full administrative, security and election arrangements
sakal
पुणे : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय, निवडणूक व सुरक्षा व्यवस्था सज्ज असून, पात्र मतदारांनी निर्भय आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.