महापालिका दृष्टिक्षेपात

महापालिका दृष्टिक्षेपात

असे असतील प्रचाराचे मुद्दे...

राष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला पाठपुरावा.  

काँग्रेस - सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देणार, दोन वेळा पाणीपुरवठा करणार, महापालिकेचे गतवैभव परत आणणार, आरोग्य सेवांचा दर्जा सुधरविणार.

भारतीय जनता पक्ष - वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, आरोग्यविषयक सुविधा, कचरा व्यवस्थापन, दर्जेदार शिक्षण आणि केंद्र, राज्य सरकारच्या जनोपयोगी योजना. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - वाहतुकीची कोंडी, शिक्षणाचा दर्जा सुधरविणार, आरोग्यासाठी सार्वजनिक सेवा दर्जेदार मिळावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आग्रह, पर्यटनाला चालना देणार. 

शिवसेना - वाहतूक कोंडी, स्वच्छ पुणे-कचरामुक्त पुणे, पाण्यासाठी मीटरला विरोध, सक्षम सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाला हेल्थ कार्ड, ई-गव्हर्नन्स.

प्रभागांचे आरक्षण

अनुसूचित जाती    22
अनुसूचित जमाती    2
नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी, भटके विमुक्त)    44
सर्वसाधारण जागा    94
एकूण जागा    १६२

मुलाखती दिलेले इच्छुक (पक्षनिहाय)

राष्ट्रवादी    595
काँग्रेस    587
भाजप    850
मनसे    525
शिवसेना    600

मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार - 21 जानेवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com