

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांची पावणेतीन कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.