

Book Procurement Controversy Hits PMC
Sakal
पुणे : शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी सहा महिने उरले असतानाच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पूरक व व्यावसायिक पुस्तके निविदा प्रक्रिया न राबविता खासगी प्रकाशन संस्थेकडून खरेदी करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. साडेचार कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावावर शुक्रवारी (ता. ३१) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.