पुणे : पद्मावती ते भिंताडेनगर नाल्याच्या स्वच्छतेला मुहूर्त

पिसोळीकरांच्या तक्रारीची पालिका प्रशासनाने घेतली दखल
Pune Municipal undri Padmavati to Bhintadenagar drainage cleaning work start
Pune Municipal undri Padmavati to Bhintadenagar drainage cleaning work startsakal

उंड्री : पावसाळा सुरू झाला असून, पिसोळी (ता. हवेली) येथील नाल्याला पूराचा धोका वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने नाल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. पिसोळीतील रामदास मासाळ, मारुती मासाळ, राजेंद्र भिंताडे, संजय धावडे, मच्छिंद्र दगडे म्हणाले की, पिसोळी येथील पद्मावती मंदिर ते भिंताडेनगर दरम्यानच्या नाला कचऱ्याने भरल्याने ओढ्याला पूर आला असता. पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या मुहूर्तावरच ओढा स्वच्छतेचे काम सुरू केले, ही बाब समाधानकारक आहे, असे यांनी सांगितले.

मागिल वर्षी पद्मावती मंदिर येथून वाहणाऱ्या ओढ्यात गाळ साचल्यामुळे पूर आला होता. मंदिराच्या जवळ दशक्रियाविधीचे ठिकाण पाण्यात गेले होते. अवकाळी पावसाच्या पाण्याने ओढा तुडुंब झाल्याने दशक्रियाविधी करता आला नव्हता.

-ललिता मासाळ, पिसोळी

पिसोळी-भिंताडेनगर दरम्याच्या ओढा मागिल अनेक वर्षांपासून स्वच्छ केला नव्हता. त्यामुळे ओढ्यामध्ये कचरा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात साचले असून, झाडीझुडपे वाढल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ओढा स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने दोन जीसीबी, दोन डंबर, कर्मचारी कार्यरत आहेत. या ओढ्याच्या स्वच्छतेचे काम पुढील आठवड्यात पूर्ण होईल. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येणार नाही.

-राजाराम देवाडकर, कनिष्ठ अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com