Pune Civic Polls: MVA Seat Sharing Finalised
esakal
पुणे महानगर पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढतील अशी चर्चा होती. मात्र, आता दोन्ही पक्ष युती करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी माहिती दिली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर निवडणूक लढवेल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.