
चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतुकही पूर्णपणे बंद असेल.
केसनंद (पुणे) : येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यामध्ये चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतुकही पूर्णपणे बंद असेल. तसेच अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गे पुण्याकडे येतील.
- 'मराठा क्रांती मोर्चा'ने राज्य सरकारच्या अध्यादेशाची केली होळी!
तसेच पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे- सोलापूर हमरस्त्याने चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर हमरस्ता अशी वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील.
- पुणेकरांनो, ख्रिसमसनिमित्त लष्कर परिसरात वाहतुकीत बदल; वाचा सविस्तर
मुंबई येथून अहमदनगर बाजूकडून जाणारी जड तसेच माल वाहतूकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड मंचर, नारायणगांव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने, (उदा. कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगर वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)