Pune : पैलवान राहुल फुलमाळी नारायणगाव केसरीचा मानकरी

एक लाख रुपयांचा इनाम व चांदीची गदा भेट
 नारायणगाव केसरी हा किताब पैलवान राहुल फुलमाळी याने पटकाविला.
नारायणगाव केसरी हा किताब पैलवान राहुल फुलमाळी याने पटकाविला.sakal

नारायणगाव : येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात नारायणगाव केसरी हा किताब पैलवान राहुल फुलमाळी याने पटकाविला. यात्रा समितीच्या वतीने रोख एक लाख रुपयांचा इनाम व एक किलोग्रॅम वजनाची चांदीची गदा फुलमाळी याला भेट देऊन त्याचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

नारायणगाव केसरीसाठी असलेली मानाची अंतिम कुस्ती पिळदार शरीर यष्टी असलेले कसलेले पैलवान राहुल फुलमाळी (पिंपळवंडी) व सचिन सुरनर(मनमाड) यांच्यात सुमारे अर्धातास चालली. ही कुस्ती कोण जिंकणार या कडे कुस्ती शौकिनांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर पैलवान फुलमाळी याने पैलवान सुरनर याला दुहेरी पट टाकून चितपट केले. कुस्ती शौकिनांनी टाळ्या वाजवून फुलमाळी यांचे अभिनंदन करून त्याच्यावर रोख बक्षिसाचा वर्षाव केला. या वेळी मुक्ताबाई माते की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवा निमित्त चोळी पातळ, छबिना, घागरी, पालखी मिरवणूक, शोभेचे दारूकाम, लोकनाटयाचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमाचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते. यात्रे निमित्ताने मंगळवारी रात्री मुस्लिम समाजाच्या वतीने शोभेचे दारूकाम करण्यात आले.

बुधवारी सायंकाळी सहा ते रात्री सव्वादहा या वेळेत यात्रे निमित्त लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाडा रंगला होता. नाशिक, संगमनेर, नगर, सातारा, कोल्हापुर, हरियाणा, उत्तरप्रदेश, धाराशिव, भोसरी सह पुणे ग्रामीण भागातील सुमारे दीडशे पैलवानांच्या कुस्त्या आखाड्यात झाल्या.

यात्रा समितीच्या वतीने कुस्त्यासाठी वजनी गट तयार केले होते.या मुळे निकाली कुस्त्यांचे प्रमाण वाढले.निकाली कुस्त्यांना टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली जात होती. आखाड्यासाठी साडेसहा लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती.अंतिम कुस्तीसाठी सुजित खैरे मित्र परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांचे तर बैलगाडा मालक राकेश खैरे यांच्या वतीने एक किलोग्रॅम वजनाची चांदीची गदा इनाम म्हणून ठेवण्यात आली होती.

रोख पाचशे रुपये ते ५१हजार रुपयांच्या दरम्यान इनाम ठेवण्यात आला होता. पाच हजार, अकरा हजार, पंधरा हजार व २१ हजार रुपये इनामाच्या सुमारे शंभर कुस्त्या निकाली झाल्या. यात्रा समितीचे स्व.दत्तोबा फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ अकरा हजार रुपये इनामच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या. पंचवीस हजार रुपये इनामाच्या बागल फुलमाळी, अजित वाराणसी, समाधान दगडे, गोवर्धन, रघुनाथ आव्हाड, विजय लोहकरे, किरण लोहकरे,

अंकित धुळवड यांच्यातील कुस्त्या लक्षवेधी झाल्या .आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते सचिन चौधरी ,अविनाश मुकुल यांच्यातील ५१ हजार रुपये इनामाची कुस्ती लावण्यात आली. आखाडा पहाण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके,विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे , युवा नेते अमित बेनके, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे , गुलाबराव नेहेरकर, सरपंच राजेंद्र मेहेर, माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे , फौजदार राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. महिला खेळाडूच्या सहा कुस्त्या निकाली झाल्या. यात्रा समितीचे प्रमुख माजी सरपंच योगेश पाटे,

संतोष खैरे, एकनाथ शेटे,सुजित खैरे, माजी सरपंच अशोक पाटे , संतोष वाजगे , दादाभाऊ खैरे, मुरलीधर फुलसुंदर, विलास पाटे, राजाराम पाटे,सदानंद खैरे, रामभाऊ तोडकरी ,अजित वाजगे,आशिष फुलसुंदर यांनी यात्रेचे नियोजन केले. डी.के.भुजबळ, आशीष माळवदकर, हेमंत कोल्हे, एच. पी.नरसुडे यांनी समालोचन केले.लाल मातीचा कुस्त्याच्या आखाडा तयार करण्यासाठी तेजस पाटे,आकाश कानसकर,

जितेंद्र भोर यांनी परिश्रम घेतले.कुस्ती आखाड्यात पंच म्हणून एच.पी.नरसुडे,माजी सरपंच अशोक पाटे ,अजित कानडे, राहुल नवले,आशिष कोल्हे,मेहबूब काझी,सुनील ढवळे,साहेबराव गाळव यांनी काम पाहिले.सुरक्षा व्यवस्था सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार सनील धनवे यांनी पाहिली,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com