''पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सन २०२४ पर्यंत पुर्ण होईल'' : खासदार कोल्हे

Pune-Nashik High Speed ​​Railway project will be completed by 2024 said MP Kolhe
Pune-Nashik High Speed ​​Railway project will be completed by 2024 said MP Kolhe

नारायणगाव(पुणे) : ''अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाशवंत शेतमालाची साठवणूक व जलद वाहतूक या बाबीवर मी लक्ष केंद्रित केले आहे. जुन्नर तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृह व सहकार तत्वावर फळभाजीपाला प्रक्रिया उद्योग पुढील पाच वर्षात सुरू केला जाईल .शेतमालाच्या जलद वाहतूकीसाठी 
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पात जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी चार मालवाहतूक रॅकची व्यवस्था केली आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सन २०२४ पर्यंत पुर्ण होईल.'', अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री उपबजाराचे व डिजिटल काटा पट्टीचे  उदघाटन आज(ता.२५) दुपारी दसऱ्याच्या महूर्तावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते.या वेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,आशा बुचके, उपसभापती दिलीप डुंबरे, जेष्ठ संचालक धोंडिभाऊ पिंगट, निवृत्ती काळे, धनेश संचेती, संतोष तांबे, प्रकाश ताजणे, विपुल फ़ुलसुंदर, रमेश भुजबळ, गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे.माऊली खंडागळे आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर सन २०१८ ला तयार झाला. मात्र या प्रकल्पाचे सादरीकरण झाले नव्हते. मी खासदार झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्या नंतर या प्रकल्पाला गती मिळाली.सद्य स्थितीत या प्रकल्पावर सुरू असलेले काम पहाता सन २०२४ पर्यंत पुणे नाशिक रेल्वे धावेल. रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करताना मी शेतकरी हिताची काळजी घेतली आहे. शेतमालाचा वाहतूकीसाठी जुन्नर साठी दोन, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी  प्रत्येकी एक रॅकची तरतूद केली आहे.वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी खेड ते चांडोली दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरु करण्यात येईल.नारायणगाव बाह्यवळण रस्ता व खेड घाटाचे काम अंतीम टप्प्यात आहे. खेड ते आळेफाटा दरम्यानच्या इतर बाह्यवळणाची कामे लवकरच सुरु होतील. जुन्नर येथील शिवसंस्कार सृष्टीचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे.या बाबत पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या समावेत बैठक झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिवसंस्कार सृष्टीचा साकारली जाईल.''

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी
 

आमदार बेनके म्हणाले केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणात त्रुटी आहेत.बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पैशाची हमी घेतात. यामुळे बाजार समित्या टिकणे आवश्यक आहे.सभापती काळे शेतकऱ्यांच्या हिताची कळजी घेत आहेत.उपबजारामूळे भाजीपाल्याला योग्य भाव मिळेल. भाजीपाला वाहतूक  चालक व मालक संघटनेच्या अडचणी सोडवल्या जातील.

पुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे उदाहरण

सभापती काळे म्हणाले  सन  २००४ साली  बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५५ कोटी रुपयांची होती.मी सभापती झाल्यानंतर उपबजार आवाराचे अत्याधुनिकरण केले.  शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे बाजार समितीच्या वार्षिक उलाढालीत बाराशे कोटि रुपयां पर्यंत वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील उपबजारात दहा हजार लिटर क्षमता असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.

शेरकर म्हणाले बाजार समितीने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.या वेळी बुचके, खंडागळे यांचे भाषण झाले. कोरोना काळात उपबजारात उत्कृष्ट सेवा बजावणारे बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे,शरद घोंगडे, व्यापारी घोलप, कमलाकर वाजगे यांचा सत्कार आमदार बेनके, खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन संचालक तांबे यांनी केले. आभार उपसभापती डुंबरे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com